Mon, Jan 30, 2023

वाशी खाडीत कुजलेला मृतदेह
वाशी खाडीत कुजलेला मृतदेह
Published on : 11 January 2023, 9:07 am
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : वाशी खाडीमध्ये मंगळवारी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला असून या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाशी खाडीत एका व्यक्तीचा मृतदेह झुडपांमध्ये अडकला असल्याची माहिती मंगळवारी दुपारी वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी घटनास्थळावर कुजलेल्या अवस्थेतील एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. या व्यक्तीचे अंदाजे ४० ते ४५ असून त्याने खाकी रंगाची पॅन्ट घातली आहे. तसेच तीन ते चार दिवसांपूर्वी दुसरीकडून भरतीदरम्यान वाहून याठिकाणी आला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.