Sun, Feb 5, 2023

दूरध्वनी केंद्राची धोकादायक केबिन
दूरध्वनी केंद्राची धोकादायक केबिन
Published on : 11 January 2023, 10:39 am
धारावी, ता. ११ (बातमीदार) : सायन येथील जैन सोसायटीमधील श्रीमती कोकिलाबेन के. ओझा मार्ग येथील पदपथावर दूरध्वनी केंद्राची जुनी व धोकादायक झालेली केबिन रस्त्याच्या दिशेला झुकलेली आहे. ही केबिन कधीही कोसळण्याची भीती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील पदपथांवरून पादचाऱ्यांची सतत वर्दळ असते. धारावीतील धोबी घाट विभागातून सायनला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. शालेय विद्यार्थी, सायन रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांची सतत ये-जा सुरू असते. जुनी व जर्जर झालेली ही केबिन कधीही कोसळण्याची भीती असून एखादी दुर्घटना घडण्याअगोदर ही केबिन काढली जावी, अशी मागणी समाजसेवक पॉल राफेल, अय्युब शेख आदींनी केली आहे.