महापालिकेच्या जुहूतील सुभोभिकरणाला बॉलीवूड कनेक्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या जुहूतील सुभोभिकरणाला बॉलीवूड कनेक्ट
महापालिकेच्या जुहूतील सुभोभिकरणाला बॉलीवूड कनेक्ट

महापालिकेच्या जुहूतील सुभोभिकरणाला बॉलीवूड कनेक्ट

sakal_logo
By

पालिकेच्या सुशोभीकरणात बॉलीवूड कनेक्ट

जुहूमध्ये अवतरणार चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे!
पालिकेच्या सुशोभीकरणात बॉलीवूडवर आधारित संकल्पना


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पश्चिम उपनगरांमधील काही ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीची आहेत. तिथे नेहमी पर्यटकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. पालिकेने अशा ठिकाणी सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्याअंतर्गत जुहू परिसराचेही रंगरूप बदलण्यात येणार आहे. तिथे बॉलीवूडवर आधारित संकल्पना विकसित करण्यात येत आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांचे चेहरे ग्राफिटी वा चित्रांच्या माध्यमातून तिथे साकारण्यात येणार आहेत.

सुशोभीकरण कामांचा भाग म्हणून जुहूतील यमुनानगरच्या विमानतळ परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तो विकसित करण्यात येत आहे. तिथे एकूण सात प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत वॉल ग्राफिटी, ओपन एअर थिएटर, पदपथ आणि रेलिंगची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्याच्या ‘आय लव्ह मुंबई’ लोगोच्या जवळच नव्या सेल्फी पॉईंटची जागा निश्चित करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुशोभीकरणामध्ये बॉलीवूड थीमचा वापर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत एकूण सात कामे करण्यात येणार आहेत. पालिकेच्या के पश्चिम विभागाकडून सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
जुहू परिसरात मोठ्या प्रमाणात बॉलीवूड सेलिब्रिटी राहतात. अनेकांची घरे तिथे आहेत. म्हणून तेथील सुशोभीकरणात बॉलीवूडची थीम पालिका वापरणार आहे. सेलिब्रिटींच्या आकर्षणामुळेच पर्यटकही जुहूमध्ये येत असतात. त्यामुळेच बॉलीवूड थीमचा वापर सुशोभीकरणाच्या कामामध्ये करण्यात येणार आहे.

अशी होणार कामे
१ पदपथासाठीही नव्या पद्धतीच्या काँक्रीटच्या पेव्हर ब्लॉकचा वापर केला जाणार आहे.
२ झाडांच्या कठड्यांनाही गार्ड लावून त्या ठिकाणी रोषणाई करण्यात येईल.
३ ओपन एअर थिएटरलाही आसन व्यवस्थेसाठी नवा लूक देण्याचा पालिकेचा मानस आहे.
४ उद्यानामध्ये झाडांच्या खाली बसण्यासाठी आरामदायी आणि प्रशस्त असे कठडे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे झाडाच्या सावलीत बसण्याचा अनुभव पर्यटकांना घेणे शक्य होईल.
५ बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांशी संबंधित वास्तू आणि शिल्पही ठेवण्यात येणार आहेत. उद्यानाच्या भितींवर ग्राफिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकारांकडून वॉल आर्ट पेंटिंग करण्यात येईल. बॉलीवूड संकल्पनेवरच ते आधारित असेल.

असे असेल सुशोभीकरण
- ओपन थिएटर
- झाडांच्या जवळ आसनव्यवस्था
- वास्तू आणि शिल्पांची उभारणी
- चालण्यासाठीचे पेव्हमेंट
- बसण्यासाठीचे उद्यान
- भिंतीवर बॉलीवूडवर आधारित थीमची ग्राफिटी