बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण
बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण

बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे निराधार महिलांसाठी विविध उपक्रम घेतले जातात. बचत गटाच्या माध्यमातून पालिका अशा महिलांना विविध उपक्रमातून स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करते. घाटकोपरच्या बचत गटातील महिलांना ९ व १० जानेवारी रोजी सक्षमीकरण व स्वयंरोजगारासाठी अगरबत्ती व मेणबत्ती याचे प्रशिक्षण देण्यात आले. एन वॉर्ड सहायक आयुक्त विभागांतर्गत मुख्य समाज विकास अधिकारी भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर भरवण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या समाज विकास अधिकारी सरला राठोड, रोटरी क्लबचे सुनील पुराणिक, भावना अन्सारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी सहभागी बचत गटातील महिलांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर उपक्रम समुदाय संघटक मनीषा माने, संगीता हिरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.