पालघर येथे आपत्ती व्यवस्थापन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर येथे आपत्ती व्यवस्थापन शिबिर
पालघर येथे आपत्ती व्यवस्थापन शिबिर

पालघर येथे आपत्ती व्यवस्थापन शिबिर

sakal_logo
By

पालघर, ता. ११ (बातमीदार) : पालघर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आयडीआरएन पोर्टलबाबत जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील विविध विभागाकडे आपत्तीसमयी शोध व बचावासाठी उपलब्ध असलेले साहित्य आणि विभागातील विशेष कौशल्य असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची नावे पोर्टलवर भरण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी प्रशिक्षण दिले. प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन साहित्याची माहिती या पोर्टलवर भरल्यास भविष्यात जर आपत्ती उद्भवली, तर आपल्या जिल्ह्यातील सर्व साहित्य उपलब्ध करून घेता येईल. तसेच आपत्ती मोठी असल्यास आपल्या जिल्ह्याच्या शेजारील किंवा इतर राज्याकडे उपलब्ध असलेले साहित्य मागवता येते. हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.