Tue, Feb 7, 2023

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला धमकी
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला धमकी
Published on : 11 January 2023, 2:04 am
मुंबई, ता. ११ : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. शाळेच्या दूरध्वनीवर मंगळवारी (ता. १०) संध्याकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शाळेत टाईमबॉम्ब ठेवल्याचे सांगितले. शाळा प्रशासनाने तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.