वसईत नातवंडांसह आजी-आजोबांची धमाल

वसईत नातवंडांसह आजी-आजोबांची धमाल

Published on

वसई, ता. १२ (बातमीदार) : आजी, आजोबा आणि नातवंडे हे नाते अगदी गुलकंदासारखे गोड, सुगंधी असते. नातवंडांचे कौतुक आणि त्यासोबत जुन्या गाण्यांचा आस्वाद म्हणजे अगदी सोन्याहून पिवळेच म्हणावे लागेल. निमित्त होते ज्येष्ठ नागरिक समाजकल्याण संस्था पापडी वसई यांचा वर्धापनदिन सोहळ्याचे. यात ज्येष्ठ नागरिक नातवंडांसोबत धमाल करण्यात रममाण झाले होते.
ज्येष्ठ नागरिक समाजकल्याण संस्था पापडी वसई यांचा वर्धापनदिन सोहळा हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी येथे पार पडला. या वेळी गुणीजनांचे सत्कार करण्यात आले. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर विषयात प्रावीण्य मिळवलेल्या सभासदांच्या नातवंडांचा गौरव करण्यात आला. या वेळी वसई विरार महापालिकेने आयोजित केलेल्या ज्येष्ठांच्या एक किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संस्थेचे ४ सदस्य, वसई-विरार कला-क्रीडा महोत्सवातील ३ सभासद व संस्थेचे सभासद असलेल्या दोन भजनी मंडळांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी तृप्ती सरदेसाई यांचा जुन्या मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला. या गाण्यांवर आजी-आजोबांसह नातवंडे डोलू लागली होती. चंद्रशेखर ठाकूर यांच्या खुसखुशीत निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली होती. या वेळी प्रभाग आयचे माजी सभापती प्रवीण शेट्टी, फेस्कॉमच्या पालघर विभागाच्या समन्वयक डॉ. वनिता केळकर, अनिलराज रोकडे, धावपटू बी. ए. कुलकर्णी व समाजसेविका प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होते.

-------------------
ज्येष्ठ नागरिक म्हटले, की अडगळीचे ठिकाण समजले जाते. आश्रमाचा रस्ता दाखवला जातो; परंतु ज्येष्ठ नागरिक संघ सर्वांना एकत्र आणत चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. कोरोनाकाळातदेखील ज्येष्ठांना एकमेकांचा आधार मिळाला. वर्धापनदिनाला नातवंडेदेखील उपस्थित झाल्याने आनंद द्विगुणित झाला होता.
- वृंदाली प्रभुदेसाई, सचिव, ज्येष्ठ नागरिक समाज कल्याण संस्था

-----------------
वसई : वसईत ज्येष्ठ नागरिक वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त उपस्थित नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com