विरारमध्ये २२ जानेवारीला एकता दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये २२ जानेवारीला एकता दौड
विरारमध्ये २२ जानेवारीला एकता दौड

विरारमध्ये २२ जानेवारीला एकता दौड

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) : विवा गिरीविहार उत्सव समिती व बहुजन विकास आघाडी आयोजित एकता दौड रविवारी (ता. २२) सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. विरार पूर्व-विवा गिरीविहार चौक-मनवेलपाडा रोड येथून या स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे १९ जानेवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रशांत राऊत (९९२३७०९१९१), स्वप्नील पाटील ८६९८६९८६९१ यांच्याकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजक विवा गिरीविहार उत्सव समिती, संघटक सचिव अजीव पाटील व प्रशांत राऊत आहेत. या स्पर्धेतून स्वच्छ विरार, सुंदर विरार हा सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.