
पावरलिफ्टिंग स्पर्धेत मातोश्री विद्यालयाला पाच पदके
डोंबिवली, ता. १२ (बातमीदार) : मातोश्री विद्यालयाने पावरलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके, दोन कास्यपदके अशी एकूण पाच पदके पटकावली आहेत.
मुंबई विद्यापीठ ठाणे झोन व श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालय कळवा आयोजित आंतरमहविद्यालयीन स्पर्धा कळवा इथे पार पडली. या स्पर्धेत १२० किलो वजनी गटात शहिद शेख, ८३ किलो वजनी गटात राम भगत, ६९ किलो वजनी गटात श्रुती मोरे यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत. ७४ किलो वजनी गटात अक्षय प्रजापती, ७५ किलो वजनी गटात साक्षी मोरे यांनी कास्यपदके पटकावली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके, संचालक एस. एस. शिवशरण, मातोश्री वेळबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्राध्यापक कोमल चंदनशिवे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. नवनाथ गायकर व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.