Wed, Feb 8, 2023

रोजगार प्रशिक्षण शिबिर
रोजगार प्रशिक्षण शिबिर
Published on : 12 January 2023, 9:25 am
भांडुप, ता. १२ (बातमीदार) ः रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी भांडुप पश्चिम कोकण नगर परिसरात समाजसेवक व मनसे उपविभाग अध्यक्ष अनिल राजभोज यांनी रविवारी (ता. १५) मोफत रोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये २० पेक्षा अधिक व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वेळी नावनोंदणी करून निवडलेल्या विषयांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. रोजगार मिळाल्यास तरुणांना त्याचा निश्चितच लाभ होईल. उद्योजकांनी आपल्या आवश्यकतेनुसार उमेदवार तयार करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राजभोज यांनी केले.