ठाण्यात संक्रांतीनिमित्त विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात संक्रांतीनिमित्त विविध स्पर्धा
ठाण्यात संक्रांतीनिमित्त विविध स्पर्धा

ठाण्यात संक्रांतीनिमित्त विविध स्पर्धा

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ (बातमीदार) : संक्रांत हा स्त्रियांसाठी खास असा सण. यानिमित्त ठाण्यातील विविध संस्था आणि मंडळांनी विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्ताने विविध उपक्रम ठाण्यात राबवले जाणार आहेत. ठाण्यातील प्रगती उद्योग या संस्थेने स्त्रियांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १४ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ या दरम्यान आई हॉल, सारस्वत बँक येथे होणार आहेत. तृप्ती इन्शुरन्स आणि होरिझन हॉस्पिटल ठाणेच्या वतीने १४ जानेवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते १ वाजता आई हॉल, सारस्वत बँक येथे होणार आहेत. याच बरोबर ठाण्यातील वनवासी आश्रमाच्या वतीने आदिवासी पाड्यांवर तिळगूळ समारंभ, तसेच वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी एकत्रीकरण हा कार्यक्रमदेखील १५ जानेवारी रोजी सकाळी विक्रमगड येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच वाल्मिकी समाज व बौद्ध समाज यांच्यासाठी भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू असे अनेक कार्यक्रम ठाण्यात राबवण्यात येणार आहेत.