इंडियन हेरीटेज सोसायटीचा उद्या संस्‍कृती संगीत महोत्‍सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडियन हेरीटेज सोसायटीचा उद्या संस्‍कृती संगीत महोत्‍सव
इंडियन हेरीटेज सोसायटीचा उद्या संस्‍कृती संगीत महोत्‍सव

इंडियन हेरीटेज सोसायटीचा उद्या संस्‍कृती संगीत महोत्‍सव

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : इंडियन हेरिटेज सोसायटी (आयएचएस) तर्फे व महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक टाऊन हॉल येथे १४ आणि १५ जानेवारीला हा महोत्‍सव साजरा होत आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी राहुल शर्मा (संतूर) सोबत पं. भवानी शंकर (पखवाज) व पं. मुकुंदराज देव(तबला) हे आपल्या स्वर्गीय सुरांच्या साथीने राहुल शर्मा यांचे वडील गुरू पद्मविभूषण स्वर्गीय पंडित शिवकुमार शर्मा यांना मानवंदना देतील; तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी विदूषी शुभा मुदगल (गायन) सोबत पं. अनिश प्रधान (तबला) व पं. सुधीर नायक (हर्मोनियम) आपल्या स्वरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील. पूर्वी संगीताची ही मैफिल वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाकाठी रंगायची; मात्र ध्वनिप्रदूषणाच्या कारणास्तव उच्च न्यायालयाच्या आदेशाने या सोहळ्याचे ठिकाण बदलून एशियाटिक लायब्ररी येथे हलवण्यात आले. सोबतच सोहळ्याचे ‘बाणगंगा फेस्टिव्हल’ हे नाव बदलून ‘मुंबई संस्कृती’ असे ठेवण्यात आले.