पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश
पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश

पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १२ (वार्ताहर)ः आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीनिमित्त पनवेल कृषी विभाग संक्रांत, भोगीला पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करणार आहे. या कार्यक्रमामध्ये कृषी विभागाबरोबरच विविध शासकीय विभाग, ग्रामपंचायत, शालेय व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर शासनाच्या कृषी विभागाने जानेवारीत साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा मकर संक्रांतीला पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणूनही नवीन ओळख मिळणार आहे. तसेच याच अनुषंगाने पालिका हद्दीतील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात पौष्टिक तृणधान्यांचा वापर करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
-------------------------------
तृणधान्याचे महत्त्व अधोरेखित करणार
आहारात पौष्टिक तृणधान्य घेण्याची परंपरा चालत आली आहे. या परंपरेचा आधार घेऊन पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी राज्यात मकर संक्रांत भोगीच्या दिवशी पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. तसेच या माध्यमातून आहारातील तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
-----------------------------------
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे नियोजन कृषी विभागाने पनवेल तालुक्यात केले आहे. याच अनुषंगाने २३ जानेवारी ते डिसेंबर २३ पर्यंत विविध कार्यक्रमांद्वारे आहारामध्ये तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यामध्ये कार्यशाळा, आहारतज्ज्ञांचे व्याख्यान, रॅली तसेच वृत्तपत्र व इतर माध्यमांतून जनजागृतीचे नियोजन आहे.
- तानाजी दोलताडे, कृषी अधिकारी, पनवेल