मुख्यमंत्र्यांचे आश्वासन तीन महिन्यात पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन तीन महिन्यात पूर्ण
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन तीन महिन्यात पूर्ण

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन तीन महिन्यात पूर्ण

sakal_logo
By

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन तीन महिन्यात पूर्ण
खारघर,ता. 12(बातमीदार) : सिडको कडून आकारला जाणारा सेवा शुल्क बंद केला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते दिलेले तीन महिन्यात पूर्ण केल्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.
सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी खारघर कॉलनी वेल्फेअर असोसिएशन सहकार्याने निर्मिती केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पिशवी वेल्डिंग मशीन अनावरण मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालें होते . यावेळी खारघर कॉलनी वेल्फेअर असोसिएशन आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पनवेल महापालिका हद्दीत रहिवासीयांकडून सिडकोकडून आकारला जाणारा सेवा शुल्क बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती. दरम्यान यावेळी शिंदे यांनी सेवा शुल्क लवकरच मागे घेण्याचा शासनाचा प्रयत्न असून लवकरच निर्णय घेतले जाईल असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार सिडको महामंडळातर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.