रस्ता सुरक्षा दल स्पर्धेत के. के. मार्ग हिंदी शाळा सर्वोत्कृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता सुरक्षा दल स्पर्धेत के. के. मार्ग हिंदी शाळा सर्वोत्कृष्ट
रस्ता सुरक्षा दल स्पर्धेत के. के. मार्ग हिंदी शाळा सर्वोत्कृष्ट

रस्ता सुरक्षा दल स्पर्धेत के. के. मार्ग हिंदी शाळा सर्वोत्कृष्ट

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ (बातमीदार) ः रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिस दलातर्फे रॅलीच्या संचलन व बँड पथकाच्या स्पर्धा आयोजित केल्‍या होत्‍या. यामध्ये मुंबई महापालिकेच्या के. के. मार्ग हिंदी शाळेच्या पथकाची सर्वोत्कृष्ट पथक म्हणून निवड करण्यात आली. या प्रसंगी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या पथकाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिस दलातर्फे दर वर्षीप्रमाणे घेण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा दलाच्या मुंबई स्तर अंतिम रॅलीच्या संचलन व बॅंड पथकाच्या स्पर्धा नुकत्‍याच घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये खासगी शाळा तसेच मुंबई महापालिकेच्या शाळांनी सहभाग घेतला होता. यापैकी खासगी शाळांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय मुलांचे तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय मुलींचे संघ त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या मुलींचा उत्कृष्ट संघ व मुलांचा उत्कृष्ट संघ असे एकूण आठ संघ निवडण्यात आले. या विजयी संघांना पारितोषिक देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पोलिस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, माजी शिक्षणाधिकारी प्रकाश चराटे, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख राजेश गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र शाळेचे कौतुक होत आहे.