Thur, Feb 2, 2023

नेरूळमध्ये चार लाखांची घरफोडी
नेरूळमध्ये चार लाखांची घरफोडी
Published on : 12 January 2023, 12:51 pm
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : अज्ञात चोरट्यांनी नेरूळ सेक्टर दहामध्ये राहणाऱ्या व्यावसायिकाचे घर फोडून त्याच्या घरातील तब्बल चार लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. नेरूळ पोलिसांनी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार भावेश जेठवा (वय ३९) यांचा फर्निचरचा व्यवसाय असून ते नेरूळमध्ये पत्नी व मुलासह राहतात. ९ जानेवारीला भावेश कुटुंबासह सायन येथे राहणाऱ्या बहिणीकडे गेले होते. त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ च्या सुमारास भावेश मुलासह घरी परतले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले.