भांडी धुताना पाणी उडाल्याने मुलुंडमध्ये हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडी धुताना पाणी 
उडाल्याने मुलुंडमध्ये हत्या
भांडी धुताना पाणी उडाल्याने मुलुंडमध्ये हत्या

भांडी धुताना पाणी उडाल्याने मुलुंडमध्ये हत्या

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : भांडी धुताना पाण्याचे शिंतोडे उडाल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याचा प्रकार बुधवारी (ता. ११) मुलुंडमध्ये उघडकीस आला. सुरेश पिटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी आरोपी कैलास जाधव (वय ४३) याला अटक केली.
मुलुंडच्या जे. एन. मार्गावरील पदपथावर बुधवारी रात्री १०.३० वाजता शिवचंद्र यादव नावाची व्यक्ती चहा आणि दुधाची भांडी धुत होती. या वेळी पाण्याचे शिंतोडे उडाल्याने आरोपी कैलास जाधवने शिवचंद्र यादव यांच्याशी हुज्जत घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारील दुकानातील मालक सुरेश पिटकर दोघांतील भांडण मिटवण्यास आले असता कैलासने सुरेश यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला जात कैलासने सुरेश यांच्या छातीवर चार ते पाच वार केल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कैलासला अटक केली आहे.