एसटीच्या प्रस्तावाला अर्थ विभागाचा हरताळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या प्रस्तावाला 
अर्थ विभागाचा हरताळ
एसटीच्या प्रस्तावाला अर्थ विभागाचा हरताळ

एसटीच्या प्रस्तावाला अर्थ विभागाचा हरताळ

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच दर महिन्याचे वेतन ७ ते १० तारखेदरम्यान देण्याचे सरकारच्या वतीने त्रिसदस्यीय समितीने न्यायालयात मान्य केले होते, परंतु या महिन्याची १२ तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. याप्रकरणी मंत्रालयातील अर्थ विभागातील अधिकारी हे सरकारला जुमानत नाहीत, असा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळते, परंतु आता १२ तारीख उलटूनही वेतन मिळालेले नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कामगारांची पीएफ, ग्रॅच्युईटी, बँक कर्ज आदी ९७८ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. तसेच वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत आल्या आहेत; मात्र त्याबाबत अर्थ विभाग गंभीर नसल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.