Wed, Feb 8, 2023

कारची काच फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास
कारची काच फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास
Published on : 13 January 2023, 11:50 am
कळवा, ता. १३ (बातमीदार) : जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबलेल्या एका व्यापाऱ्याच्या कारची काच तोडून अज्ञात चोरट्याने साडेआठ लाखांचा ऐवज असलेली बॅग लंपास केल्याची घटना शिळ-डायघर हद्दीतील फडकेपाडा येथे घडली. मार्केटिंगचा व्यवसाय करणारे जय दर्यासिंग जाधव (वय ३१, रा. डोंबिवली) हे गुरुवारी (ता. १२) रात्री नवी मुंबईवरून येताना शीळ डायघर हद्दीतील फडकेपाडा येथील शालू हॉटेलमध्ये रात्री १० च्या सुमारास जेवणासाठी थांबले होते. हॉटेलबाहेर पार्किंग केलेल्या त्यांच्या कारची काच तोडून त्यातील रोख रक्कम, लॅपटॉप, मॅकबुक असा एकूण आठ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात शिळ-डायघर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.