Mon, Jan 30, 2023

इमारतीतील आगीत ६८ मीटर बॉक्स जळून खाक
इमारतीतील आगीत ६८ मीटर बॉक्स जळून खाक
Published on : 13 January 2023, 12:32 pm
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : कळव्यातील मनीषा नगर गेट नंबर २ जवळ असलेल्या प्रेम कुटीर सोसायटीच्या मीटर बॉक्स रूमला शुक्रवारी (ता. १३) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत तब्बल ६८ मीटर बॉक्स आणि दोन लोखंडी कपाट, प्लास्टिक ड्रम व खुर्च्या जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलिस, टोरंट पॉवर विद्युत विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी तातडीने धाव घेतली. जवळपास तासाभराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत कोणालाही दुखापत झालेली नसून आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.