तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, १५ जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ स्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) पॅनेलचे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) पॅनेलमध्ये रूपांतर करण्यासाठी वांद्रे ते अंधेरी अप-डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी (ता. १४) रात्रकालिन मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंड, अप-डाऊन जलद मार्ग
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्यानंतर या लोकल डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच अप जलद लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या सेवा पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल ते वाशी, अप-डाऊन मार्ग
कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत बेलापूर, पनवेल येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल-ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे-पनवेल सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वे
कुठे : वांद्रे ते अंधेरी, अप-डाऊन धीमा मार्ग
कधी : शनिवारी रात्री १० ते पहाटे ४.३५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वांद्रे ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर वळविण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द; तर काही अंशतः रद्द राहतील.