कंत्राटदार गोळीबार प्रकरणी चौघे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटदार गोळीबार प्रकरणी चौघे अटकेत
कंत्राटदार गोळीबार प्रकरणी चौघे अटकेत

कंत्राटदार गोळीबार प्रकरणी चौघे अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुंबई पालिकेतील कंत्राटदारावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी ४ जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुरुवारी (ता. १२) रात्री भिवंडीतून अटक केली आहे. सागर येरुणकर, करण थोरात, अभिषेक सावंत, विनोद कांबळे अशी चौघांची नावे असून, ते घाटकोपर भागातील रहिवासी आहेत. या प्रकरणात समीर सावंत व गणेश चुक्कल यांचा शोध पोलिस घेत आहेत. अटक चौघेजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घाटकोपर, भोईवाडा पोलिस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चौघांना न्यायालयाने १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कुर्ला भागातील कापडिया नगर परिसरात सोमवारी (ता. ९) रात्री सूरज देवरा (रा. दहिसर) या कंत्राटदारावर गोळीबार करण्यात आला होता.प्राथमिक तपासात महापालिकेतील कांत्रटावरून काही आर्थिक व्यवहारांमुळे गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.