- मेट्रो स्थानकांतून मिळेल ७० लाख रुपयांचे नॉन-फेअर महसूल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

- मेट्रो स्थानकांतून मिळेल ७० लाख रुपयांचे नॉन-फेअर महसूल!
- मेट्रो स्थानकांतून मिळेल ७० लाख रुपयांचे नॉन-फेअर महसूल!

- मेट्रो स्थानकांतून मिळेल ७० लाख रुपयांचे नॉन-फेअर महसूल!

sakal_logo
By

मेट्रो स्थानकांतून मिळेल ७० लाख रुपयांचा नॉन-फेअर महसूल!
एमएमआरडीएचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक मार्ग २ अ च्या शेवटचे आणि तीन मजली सिंगल पिअर कॅंटिलीव्हर स्थानक आहे. ज्यामध्ये प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लेव्हल, कॉन्कोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म लेव्हल यांचा समावेश आहे. या स्थानकाच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट या पहिल्या मजल्यावरील व्यावसायिक जागेमुळे प्राधिकरणाला दरमहा अंदाजे ७० लाख रुपये नॉन-फेअर महसूल मिळण्याचा अंदाज एमएमआरडीएने व्‍यक्‍त केला आहे.
मेट्रो मार्ग २ अ चे अंधेरी (प.) हे स्थानक डीएन नगर या मेट्रो मार्ग १ वरील स्थानकाशी जोडलेले असल्याने या दोन्ही मेट्रो मार्ग प्रवाशांना विनाव्यत्यय प्रवासासाठी सुलभ आहेत. डीएन नगर मेट्रो स्थनाकाजवळ मेट्रो १ च्या मर्गिकेवरून मेट्रो २अ ची मार्गिका सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी या मर्गिकेची उंची जमिनीपासून सुमारे २२ मीटरने वाढवावी लागली. परिणामी प्लॅटफॉर्म उंची साधारण प्लॅटफॉर्मच्या उंचीपेक्षा ८ मीटरने वाढली. त्यामुळे या अतिरिक्त जागेचा सुनियोजित वापर करण्याकरिता एक मजला वाढवला आहे.

हे होते आव्‍हान
लिंक रोडवर होणारी दाट वाहतूक पाहता दिवसाच्या वेळी त्या ठिकाणाचे प्राथमिक सर्वेक्षण करणे हे एक आव्हान होते, तसेच रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केलेली असल्याने सर्वेक्षणात अडथळे आले. मात्र वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून हे काम पूर्ण करण्यात आले. तसेच लिंक रोडवरील दाट वाहतुकीमुळे तिथे रस्ते वाहतूक टप्प्याटप्प्याने अंशतः थांबवणे आणि बॅरिकेडिंगसाठी परवानग्या मिळवणे हेदेखील आव्हानात्मक होते.


मेट्रो मार्ग २अ आणि ७ सुरू झाल्यावर लाखो प्रवाशांना याचा फायदा होईल. अंधेरी (प.) हे स्थानक मेट्रो मार्ग १ सोबत जोडलेले असल्याने हे स्थानक अंदाजे ३० हजार प्रवाशांना सेवा देईल. अंधेरी (प.) वरून उत्तर किंवा पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ते एक केंद्रबिंदूदेखील बनेल. दहिसर, गोरेगाव ते घाटकोपरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
– एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए