लग्नसराईत फॅशनेबल ‘पोटली’चा थाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नसराईत फॅशनेबल ‘पोटली’चा थाट
लग्नसराईत फॅशनेबल ‘पोटली’चा थाट

लग्नसराईत फॅशनेबल ‘पोटली’चा थाट

sakal_logo
By

घणसोली ः बातमीदार
लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खास असतो. त्यामुळे या दिवशी इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी अट्टहास असतो. अशातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत नवरीचा लुक आणखी सुंदर बनवण्यासाठी बाजारात विविध वस्तू सध्या उपलब्ध आहेत. त्यातीलच एक अशा फॅशनेबल ‘पोटली’ची सध्या बाजारात चर्चा आहे.
---------------------------------
लग्नसराई सुरू झाली आहे. बाजारात बस्ता बांधण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लग्नात केवळ नववधूच नाही, तर लग्नाला येणारे पाहुणेही खूप उत्साही असतात. विशेषतः नवरी मुलगी तर महिनाभर अगोदरपासून कपडे, दागिने, पादत्राणे, केशरचना या सर्व गोष्टींची तयारी सुरू करते; पण एका विशिष्ट गोष्टीकडे आपण फारसे लक्ष देत नाही, ती म्हणजे हँडबॅग. वैवाहिक जीवनात महिलांना वारंवार मेकअपची गरज असते, त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्याकडे अशी हँडबॅग असावी. त्यामुळे सध्या बाजारात पोशाखाला अनुरूप अशा पारंपरिकच नव्हे तर वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न आउटफिट्ससाठी सुंदर पोटली सर्वोत्तम तसेच लोकप्रिय पर्याय उपलब्ध आहे.
----------------------------------
हस्तकलेचा वापर
या प्रकारची पोटली बॅग्सची रचना भरलेल्या स्वरूपात असते. ही बॅग्स हस्तकला करून तयार केली जाते. अशा प्रकारची पोटली बॅग तुम्ही साडीसोबत वापरू शकता. अशा प्रकारची पोटलीची बॅग बाजारात ५०० ते १००० रुपयांना मिळते.
----------------------------------
एम्ब्रॉडरीने हटके लुक
या प्रकारच्या पोटली बॅग्सवर केलेली फुलांची रचना अतिशय सुंदर दिसते. वर्क पोटली बॅगचा हा प्रकार तुम्हाला फ्लोरल वर्क पोटली बॅगच्या नावानेदेखील माहीत असेल. याची किंमत जवळपास ६०० ते १००० रुपयांमध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क असलेली पोटली बॅग्स मिळते.
-----------------------------------------
इंडो-वेस्टर्न ड्रेसला पर्याय
या प्रकारची पोटलीची रचना अगदी अनोखी दिसते. अशा प्रकारच्या तुम्ही इंडो-वेस्टर्न ड्रेससोबत वापरू शकता. मोती आणि खडे वापरून वर्क केलेली पोटली बॅग तुम्हाला १००० ते १२०० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.
---------------------------------
विविध रंगसंगतीमुळे आकर्षण
सोनेरी आणि चंदेरी हा कलर कॉमन आहे, तर हिरवा, लाल, पिवळा अशा अनेक रंगात पोटली बॅग्स सहज उपलब्ध होतात. खास करून तुमचे मेकअपचे साहित्य, मोबाईल फोन, टिशू पेपर, तुमचे पैसे किंवा लहान सहन गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी करू शकतात. या पोटली बॅग्सची किंमत त्याच्या लुकवर अवलंबून आहे.
-------------------------------
पोटली बॅग्स म्हणजे महिलांचा लुक आणखी खास करणारी वस्तू म्हणावी लागेल. अगदी छोट्या बॅग्स हातात असल्या की ओझं ही वाटत नाही. एक ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व पहायला मिळतो.
- मनीषा मिश्रा, महिला
------------------------------------
सध्या महिला मोठ्या प्रमाणात पोटली बॅग्सची मागणी करत आहेत. यात हिरे, हाताने केलेल्या नक्षीकामातील बरेच प्रकार उपलब्ध आहेत.
- रमेश गुप्ता, व्यापारी