
कल्याणमध्ये कोकण महोत्सवाची सुरुवात
कल्याण, ता. १४ (बातमीदार) : कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आयोजित कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात ‘कोकण महोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते २२ जानेवारी २०२३ दरम्यान हा महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सवाची सुरुवात कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे यांच्या हस्ते सपत्निक गणेशाची पूजा करून करण्यात आली. या महोत्सवासात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी नवल देवळेकर प्रस्तुत ऑकेस्ट्रा ताल बिट्सचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावत आयोजकांचे कौतुक केले. या वेळी खासदारांसोबत उपस्थित माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, नीलेश शिंदे, अभिमन्यू गायकवाड यांचा कोकण महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड व प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांनी सत्कार केला.