सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती आगळीवेगळी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती आगळीवेगळी साजरी
सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती आगळीवेगळी साजरी

सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती आगळीवेगळी साजरी

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : कल्याण पूर्वयेथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत ढोल-ताशाच्या गजरात महिला पालकांचे स्वागत करत राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सम्राट अशोक विद्यालयात महिला पालकांना राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत बोलावले होते. या वेळी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. वर्गवार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत आपल्या आईला गुलाबपुष्प देत स्वागत केले. मोबाईल, टीव्हीमुळे पालक, विद्यार्थी यांचा संवाद दुरावत चालला आहे. पालक-विद्यार्थी यांच्यात खेळीमेळीचे वातावरण राहावे म्हणून राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पालक प्रतिनिधींसह प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे, मुख्याध्यापक गुलाबराव पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी काळे यांनी केले; तर आभार संतोष कदम यांनी मानले.