अचिव्हर्स कॉलेजमध्ये वैद्यकीय, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अचिव्हर्स कॉलेजमध्ये वैद्यकीय, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर
अचिव्हर्स कॉलेजमध्ये वैद्यकीय, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर

अचिव्हर्स कॉलेजमध्ये वैद्यकीय, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ : अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहेलीच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, पालक व रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, वैद्यकीय तपासणीसाठी ८७ लाभार्थी, नेत्रतपासणीसाठी ११४ लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली असून, या शिबिरात एकूण ५० युनिट रक्त पिशव्या जमा करण्यात आल्या. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. महेश भिवंडीकर, ट्रस्टी सीए गौरांग भिवंडीकर, प्राचार्या सोफिया डिसोझा, उपप्राचार्या सना खान आणि एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी राजेशकुमार यादव, नेहा त्रिपाठी आणि जायंट्स ग्रुपचे डिंपल धाईफुले, कौशल्या पाटील आणि प्रकाश माळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएसच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.