विहिरीत मृतदेह आढल्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विहिरीत मृतदेह आढल्याने खळबळ
विहिरीत मृतदेह आढल्याने खळबळ

विहिरीत मृतदेह आढल्याने खळबळ

sakal_logo
By

शहापूर, ता. १४ (बातमीदार) : शहापूरजवळील पळसपाडा येथील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. पळसपाडा येथील भास्कर रखमा भांगरे यांच्या विहिरीवर तेथील महिला पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असता विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. विहीर मालकाने लगेच शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल होत, स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. अनोळखी मयताचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे व उंची ५ फूट, काळे केस, अंगात गुलाबी रंगाचा फूल टी-शर्ट, राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट, हातात तांब्याचा व स्टीलचा कडा, गळ्यात ओमचा लॉकेट, डाव्या कानात बाळी, दाढी असून या इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांनी दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे व पोलिस हवालदार गिरी करत आहेत.