टँकरमधील ऑईलची चोरणारे त्रिकूट जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टँकरमधील ऑईलची चोरणारे त्रिकूट जेरबंद
टँकरमधील ऑईलची चोरणारे त्रिकूट जेरबंद

टँकरमधील ऑईलची चोरणारे त्रिकूट जेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : टँकरमधील ऑईलची चोरी करून विक्री करणाऱ्या त्रिकुटाला पोलिस उपायुक्तांच्या अधिपत्याखालील पथकाने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरी प्रकरणातील अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

रबाळे एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात टँकरमधून चोरी केलेल्या पॉवर ऑईलची साठवणूक करून त्याची डिझेल म्हणून बेकायदा विक्री केली जात असल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांना मिळाली होती. सहायक पोलिस निरीक्षक सलीम शेख व त्यांच्या पथकाने बुधवारी (ता. ११) रात्री रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने रबाळे एमआयडीसीतील अपार इंडस्ट्रीज कंपनीजवळ जात पाहणी केली. तेथील मोकळ्या मैदानात तीन व्यक्ती टँकरच्या वॉल्वचे नटबोल्ट खोलून त्यातील ऑईल नरसाळ्याद्वारे कॅनमध्ये भरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या पथकाने मोहम्मद आरिफ वारीस अली शेख (वय ३५), मोहम्मद रिझवान बिस्मिल्ला शाह (२४) आणि मोकर्रम अख्तरअली शेख (२३) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी बिपिन यादव (२५) व राकेश यादव (४५) यांच्या सांगण्यावरून पॉवर ऑईल चोरून ते डिझेल म्हणून विकत असल्याचे सांगितले.