Wed, Feb 1, 2023

माजी महापौर पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
माजी महापौर पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Published on : 14 January 2023, 4:44 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : एसआरए योजनेत फसवणूक केल्याप्रकरणी वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरळीतील गोमाता नगर येथील एसआरए प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. साईप्रसाद पेडणेकर यांच्याशी संबंधित कंपनीच्या पाच सदस्यांविरोधात यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने समन्स जारी केल होते. सर्वांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. ए. ए. जोगळेकर यांनी दिले आहेत. बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी कंपनी कायद्यांतर्गत ही कारवाई झाली होती.