वर्तक महाविद्यालयात ‘ग्राहकांचे अधिकार’ विषयावर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्तक महाविद्यालयात ‘ग्राहकांचे अधिकार’ विषयावर व्याख्यान
वर्तक महाविद्यालयात ‘ग्राहकांचे अधिकार’ विषयावर व्याख्यान

वर्तक महाविद्यालयात ‘ग्राहकांचे अधिकार’ विषयावर व्याख्यान

sakal_logo
By

विरार, ता. १५ (बातमीदार) : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ‘ग्राहकांचे अधिकार’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सुरेश सुर्वे हे या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते होते. ग्राहकांचे अधिकार, ग्राहकांची फसवणूक, कायदेशीर हक्क अशा अनेक विषयांवर त्यांनी स्वयंसेवकांना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी, अशा व्याख्यानांद्वारे ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन व्यापारातील गैरव्यवहार व फसवणूक नष्ट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आदिती यादव यांनी या प्रास्ताविक केले. स्वयंसेविका खुशी शर्मा हिने वक्त्यांचा परिचय करून दिला. तसेच स्वयंसेविका मनीषा राजपूत हिने आभार व्यक्त केले. रासेयो स्वयंसेविका दिव्या माटे हिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.