उरण खाडीत डिझेलची तस्करी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरण खाडीत डिझेलची तस्करी
उरण खाडीत डिझेलची तस्करी

उरण खाडीत डिझेलची तस्करी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : डिझेलचा बेकायदा साठा असलेली एक संशयित बोट नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा शाखेच्या हाती लागली आहे. या कारवाईत पाच लाखांचे दीड हजार लिटर डिझेल जप्त करण्यात आले असून उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाला नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पहाटे तीनच्या सुमारास उरणमधील पिरकोन ते वशेणी भागात खाडीमध्ये फायबरची बोट नांगर टाकलेल्या स्थितीत आढळून आली होती. सागरी सुरक्षा शाखेच्या पथकातील पोलिसांनी बोटीजवळ जाऊन पाहणी केली असता बोटीवर नाव अथवा कोणताही क्रमांक नसल्याचे, तसेच बोटीवर कोणीही व्यक्ती नसल्याचे त्यांना आढळून आले होते. यावेळी सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाने केलेल्या तपासणीत बोटीत बेकायदा डिझेलचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाने खाडीमध्ये शोध घेतला. मात्र कोणीही सापडले नसल्याने बोटीमधील दीड हजार लिटर डिझेलचा साठा जप्त करून उरण पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
--------------------------------------------
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
बोटीमध्ये डिझेलच्या बेकायदा साठवणूक प्रकरणी उरण पोलिसांनी कलम २८५, ३३६ तसेच पेट्रोलियम अधिनियमास अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच समुद्रात असलेल्या जहाजातून कमी किमतीत डिझेलची खरेदी करून बेकायदा विक्रीची शक्यतादेखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.