Sun, Jan 29, 2023

डहाणूत रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात
डहाणूत रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात
Published on : 15 January 2023, 10:57 am
कासा, ता. १५ (बातमीदार) : जिल्हा वाहतूक शाखा पालघर यांच्यामार्फत ११ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी डहाणू येथील के. एल. पोंदा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी डहाणू तालुक्यातील महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच रिक्षा चालक-मालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी डॉ. आरिफ बेग यांनी वाहन चालवण्यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तहसीलदार अभिजित देशमुख, राजेंद्र वळवी, के. एल. पोंदा हायस्कूलचे प्राचार्य एन. इंगळे, महिला पोलिस उपनिरीक्षक एस. सांगळे, मनसे डहाणू तालुकाप्रमुख विपुल पटेल, महिला शिवसेना तालुकाप्रमुख उज्ज्वला डामसे तसेच डहाणू पोलिस ठाण्याचे अंमलदार उपस्थित होते.