मलंगगड पट्ट्यात ठाकरे गटाला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलंगगड पट्ट्यात ठाकरे गटाला धक्का
मलंगगड पट्ट्यात ठाकरे गटाला धक्का

मलंगगड पट्ट्यात ठाकरे गटाला धक्का

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः कल्याण ग्रामीण भागातील मलंगगड परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण डोंबिवलीतील अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. कल्याण ग्रामीण भागातील मलंगगड पट्ट्यातील शिवसैनिकांनी मात्र ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. या शिवसैनिकांची मने वळवण्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गुरुवारी या भागातील ठाकरे समर्थकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मलंगगड भागातील ठाकरे गटातील शिवसैनिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. खासदार शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटातील वसार गावचे शाखाप्रमुख अशोक म्हात्रे, उपविभाग प्रमुख संजय फुलोरे, उप विभाग अधिकारी सुभाष गायकर, बजरंग दलाचे प्रमुख राजेश गायकर यांच्यासह हरीष पावशे, रवी शेलार, शिवाजी भोईर, दिपक वायले, जोगेंद्र म्हात्रे, अक्षय म्हात्रे, अतुल म्हात्रे, जय वायले, काळु मढवी आणि ताराचंद सोनावणे यांनी प्रवेश केला. या वेळी महेश गायकवाड म्हणाले, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याची उकल करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपात राज्याला प्रथमच मिळाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे व खासदार शिंदे यांची विकास कामे तरुणांना भावत असून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे त्यांचा ओढा वाढत आहे. युवा पिढीचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला आमच्या कामामुळे यश मिळाले आहे. भविष्यात कल्याणमधील अनेक शिवसैनिक - पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.