बोरीवलीत क्रीडासंकुलाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरीवलीत क्रीडासंकुलाचे उद्घाटन
बोरीवलीत क्रीडासंकुलाचे उद्घाटन

बोरीवलीत क्रीडासंकुलाचे उद्घाटन

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः बोरिवली येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोरिवली स्केटिंग रिंग, बॉक्सिंग आणि बास्केटबॉल क्रीडा संकुलाचे उद्‌घाटन नुकतेच करण्यात आले. कांदिवलीच्या (पश्चिम) महावीर नगर-पावनधाम परिसरात हे संकुल असून बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या संकल्पनेतून ते तयार झाले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी महापालिका उपायुक्त भाग्यश्री कापसे, आईस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस जे. एस. साहनी, ऑलिंपिक कुस्तीपटू नरसिंह यादव उपस्थित होते. गेल्या वर्षी या संकुलाची घोषणा केल्यावर त्यानुसार वर्षभरात त्याचे उद्‍घाटन करण्यात आले. तरुणांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त करण्यासाठी अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. ज्यामुळे हे खेळाडू वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. तसेच या संकुलातून देशालाही दर्जेदार खेळाडू मिळतील, असे सुनील राणे या वेळी म्हणाले.