तलावाची उंची वाढवल्यास पाणीटंचाई दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावाची उंची वाढवल्यास पाणीटंचाई दूर
तलावाची उंची वाढवल्यास पाणीटंचाई दूर

तलावाची उंची वाढवल्यास पाणीटंचाई दूर

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) : अंबरनाथच्या जावसई भागातील पाझर तलावाची उंची वाढवून मजबुतीकरण केल्यास पाण्याच्या समस्येवर तोडगा निघू शकेल. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केले. अंबरनाथ पश्चिम येथील जावसई, डीफेन्स कॉलनी व ठाकूर पाडा या आदिवासी वस्ती परिसराला जाणवणाऱ्या पाणीटंचाईमधून तोडगा काढण्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच पंचायत समितीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसह नुकताच पाहणी दौरा केला.
यावेळी परिसरातील नागरिकांची मते आमदार डॉ. किणीकर यांनी जाणून घेतली. पाणीटंचाई समस्या दूर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. पाझर तलाव जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करून घेण्याकरिता प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, लेनिन मुककु, महिला आघाडीच्या लिनाताई सावंत, शाखाप्रमुख सुरेश वाघ, मजीप्राचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगार, उपअभियंता महेंद्र चांदेकर, अंबरनाथ पंचायत समितीचे अभियंता शिवाजी माहोरे आदी उपस्थित होते.

---------------------
तलावाची डागडूजी होणार
जावसई परिसरात सुमारे २००० हून अधिक लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत पार पडलेल्या बैठकीत या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाझर तलावांची उंची वाढवून मजबुतीकरण करण्यात यावे. तसेच याठिकाणी जल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुषंगाने आमदार डॉ. किणीकर यांनी अभियंत्यासमवेत या तलावाची पाहणी केली. या तलावाची डागडुजी करण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.