Sun, Jan 29, 2023

संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ उत्साहात
संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ उत्साहात
Published on : 16 January 2023, 11:43 am
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : वनवासी कल्याण आश्रमातर्फे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मोखाडा येथील महिला व बालतज्ज्ञ डॉ. भारती उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे वनवासी कल्याण आश्रम पालघर जिल्हा अध्यक्ष महाले बाबा, सामाजिक कार्यकर्त्या अनिता राऊत, अंगणवाडी सेविका भागीरथी उपस्थित होत्या. श्रीराम मंदिरामध्ये दीपप्रज्ज्वलन करून मानाचा विडा अर्पणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतमाता, श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून श्री महाले बाबा यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर भागीरथी यांनी महिलांना संक्रांतीविषयी माहिती दिली.