खाडे विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाडे विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
खाडे विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

खाडे विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

शहापूर, ता. १६ (बातमीदार) : शहापुरातील ग. वि. खाडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संस्थेचे अध्यक्ष जयवंतभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. समारंभाचे सूत्रसंचालन वैशाली जागरे व मनीषा पाटील यांनी; तर प्रास्तविक व मनोगत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे व उपमुख्याध्यापक शिवाजी पाटील, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य रवींद्र खरात यांनी केले. यावेळी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून देणगी रूपाने शाळेतील सुमारे शुद्ध पाणी देणारा प्रकल्प व संपूर्ण शाळेसमोरील मैदानावर पेवरब्लॉक आदी सुविधा उपलब्ध करून देणारे उद्योजक अमित कोठारी व समीर पारेख यांचे विशेष कौतुक करून संस्थेचे अध्यक्ष जयवंतभाऊ देशमुख यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सचिव विद्याताई वेखंडे, आमदार दौलत दरोडा, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, संस्थेचे पदाधिकारी सदाशिव खाडे, निखिल खाडे, नारायण विशे, उद्योजक अमित कोठारी, समीर पारेख, शशिकांत वेखंडे, जयदीप देशमुख, श्रेयस वेखंडे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे, अनंता चौधरी, उपप्राचार्य रविंद्र खरात आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक व विद्यार्थी होते.