सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे ठिय्या
सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे ठिय्या

सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे ठिय्या

sakal_logo
By

मनोर, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. उपकेंद्र स्तरावर सेवा देणाऱ्या समुदाय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे आंदोलन केले. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे दोनशे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी भाग घेतला.
समुद्राय आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांची भेट घेत निवेदन दिले. जिल्हा परिषदेतर्फे राज्य सरकारला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागण्या पोहचवल्या जातील, तसेच मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
समुद्राय आरोग्य अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी जिल्हा अध्यक्ष डॉ. अभिजित महाजन यांनी दिली.