गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे वाटप

sakal_logo
By

कल्याण, ता. १७ (बातमीदार) : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमदार गणपत गायकवाड यांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. आमदार म्हणून मिळत असलेल्या मानधनामधून दर महिन्याला गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीच्‍या धनादेशाचे वाटप नुकतेच कल्याण पूर्वमध्ये करण्यात आले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात २००९ पासून गणपत गायकवाड आमदार म्‍हणून कार्यरत आहेत. शिक्षण व ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यात नक्कीच प्रगती करतील व कुटुंबीयांचे नाव मोठे करतील, असे मत गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केले.