स्काऊट गाईड शिबिर उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्काऊट गाईड शिबिर उत्साहात
स्काऊट गाईड शिबिर उत्साहात

स्काऊट गाईड शिबिर उत्साहात

sakal_logo
By

पडघा, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे स्काऊट गाईड शिबिर उत्साहात पार पडले. गाईड चळवळीद्वारे विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर व्हावे, त्यांच्या अंगी स्वयंशिस्त यावी, या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे दोनदिवसीय स्काऊट गाईड शिबिर १३ ते १४ जानेवारी रोजी पडघ्याजवळील मोंडुळे ढोकालपाडा गावात घेण्यात आले. या वेळी विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन पद्मश्री अण्णासाहेब जाधव स्काऊट पथक व मातोश्री उषाताई जाधव गाईड पथकाद्वारे करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेंतर्गत नदीवर बंधारा बांधून पाणी अडवले. तसेच ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत गावाची स्वच्छता केली. या वेळी तंबू सजावट, बिनभांड्याचा स्वयंपाक, मनोरंजनात्मक खेळ, शेकोटी सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.