सकाळी सकाळी कचऱ्याचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळी सकाळी कचऱ्याचे दर्शन
सकाळी सकाळी कचऱ्याचे दर्शन

सकाळी सकाळी कचऱ्याचे दर्शन

sakal_logo
By

घणसोली, ता. १७ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेने उभारलेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जॉगिंग पार्कच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात सुकलेला पालापाचोळा टाकण्यात येत आहे. त्यामुळे उद्यानात व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना सकाळच्या प्रहरी कचऱ्याचे दर्शन घडत आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या प्रत्येक विभागात नवनवीन योजना राबवल्या आहेत. जॉगिंग पार्क, उद्याने, खेळाचे मैदान यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी महापालिकेने उपलब्ध करून दिले आहेत; परंतु अनेकदा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचादेखील सामना करावा लागत आहे. घणसोली विभागातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जॉगिंग पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुकलेल्या पालापाचोळांचा ढीग साचलेला आहे. यामुळे पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला बाधा पोहोचत असून पार्कला बकाल स्वरूप आले आहे.
------------------------------
घणसोली सेक्टर ९ येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जॉगिंग पार्कच्या बाहेर अनेकदा सुकलेला पालापाचोळा टाकण्यात येतो. यामुळे पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांची वाट अडवली जात आहे.
- विनय माने, नागरिक