रस्त्यावर पालिकेचा अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर पालिकेचा अडथळा
रस्त्यावर पालिकेचा अडथळा

रस्त्यावर पालिकेचा अडथळा

sakal_logo
By

धारावी, ता. १७ (बातमीदार) : धारावीतील संत रोहिदास मार्गावरील काळा किल्ला परिसरातील अशोक मिल कम्पाऊंडसमोरील रस्त्यावर पालिकेने भूमिगत कामासाठी रस्ता खोदला होता; मात्र खोदलेला खड्डा बुजवला नाही. त्यावर पत्रे टाकून तात्पुरता झाकून ठेवला आहे. यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी व वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. धारावीतून शीव रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या दिशेला रस्त्यावर काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. रस्त्यावर सतत पादचाऱ्यांची व वाहनांची वर्दळ असते. अनेकदा रस्त्यावर वाहतूककोंडी होते. त्यात या खड्ड्यामुळे भर पडली आहे. मोठा खड्डा असल्याने रस्त्याचा मोठा भाग व्यापला गेला आहे. पालिकेने त्वरित खड्डा बुजवण्याची मागणी होत आहे.