Thur, Feb 2, 2023

दिघामध्ये बर्निंग ट्रकचा थरार
दिघामध्ये बर्निंग ट्रकचा थरार
Published on : 17 January 2023, 11:12 am
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः ठाणे-बेलापूर मार्गावर वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रकला आग लागली होती. मंगळवारी दुपारी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
दिघा येथील संजय गांधी नगर भागामध्ये एमएच ०४ बीयू ६३८८ या क्रमांकाच्या ट्रॅकला आग लागल्याची माहिती ऐरोली अग्निशमन केंद्राला मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी वाहतूक पोलिस, रबाळे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले होते. या वेळी घटनास्थळी वाहनाचा चालक किंवा मालक कोणीच नव्हते. त्यामुळे पोलिस वाहनांच्या मालकांचा शोध घेत आहे. ट्रकच्या सीएनजीतील गळतीमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाचे अधिकारी एकनाथ पवार यांनी व्यक्त केली आहे.