Sat, Jan 28, 2023

गोल्ड फ्रोजन फूड्स तर्फे उत्पादनांची नवीन श्रेणी
गोल्ड फ्रोजन फूड्स तर्फे उत्पादनांची नवीन श्रेणी
Published on : 17 January 2023, 4:16 am
गोल्ड फ्रोजन फूड्सतर्फे नवीन श्रेणी
मुंबई, ता. १७ : नववर्षात गोल्ड फ्रोजन फूड्सतर्फे गुणवत्तापूर्वक घटकांपासून बनविलेल्या पदार्थांची श्रेणी बाजारात दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सोयीस्कर पॅकेजिंगसह, हे पदार्थ पटकन आणि सहजपणे शिजवले जाऊ शकतात. तसेच पनीर पराठा, गोबी पराठा आणि मिक्स व्हेज पराठा यासह विविध प्रकारच्या फिलिंगमधून पराठ्यांचा आस्वाद घेता येमार आहे. हे आधीच शिजवलेले, भरलेले पराठे ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये सहज तयार केले जाऊ शकतात. शिवाय ते कोणत्याही ट्रान्स-फॅट, कृत्रिम चव, रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्हशिवाय तयार करण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.