Tue, Feb 7, 2023

विज्ञान प्रदर्शनात पोशेरा केंद्र शाळा प्रथम
विज्ञान प्रदर्शनात पोशेरा केंद्र शाळा प्रथम
Published on : 17 January 2023, 2:17 am
जव्हार, ता. १७ (बातमीदार) : २०२२-२३ चे मोखाडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तालुक्यातील डोलारे या गावात असलेल्या आदिवासी माध्यमिक विद्यालय या शाळेत आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात एकूण ८५ प्रकल्पांचा सहभाग होता. त्यापैकी प्राथमिक शाळांचे ४० प्रकल्प समाविष्ट करण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक गटातून पोशेरा केंद्र शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. हा प्रकल्प टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे असा होता. हा प्रकल्प चंपालाल पावरा या शिक्षकाच्या माध्यमातून दीक्षा पाटील व साधना वाघ यांनी बनवला होता. हा प्रकल्प सादर करताना प्लास्टिक कटर मोटर, फेकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, विद्युत व्यवस्था आदी साहित्य वापरण्यात आले होते.