अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी
अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी

अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी

sakal_logo
By

अंधेरी, ता. १७ (प्रतिनिधी) ः मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या अभिनेत्रीच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी ९ जानेवारी रोजी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहे.

ही अभिनेत्री सांताक्रूझ परिसरात राहते. ती सध्या स्टार प्लसच्या एका मालिकेत काम करते. तिचे अनेक फॉलोअर असून ते तिच्या इन्स्टाग्रामवर कमेंट्स देतात. रविवारी ८ जानेवारीला ती तिच्या पतीसोबत जोगेश्‍वरीतील ओशिवरा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. या वेळी ती तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट चेक करत होती. या वेळी तिचा फोटो टॅग करून एका अज्ञात व्यक्तीने मॅसेजद्वारे तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या मॅसेजचा स्क्रिनशॉट तिने काढला होता. हा प्रकार तिने तिच्या पतीसह इतर मित्रांना सांगितला. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ती तिच्या पतीसोबत ओशिवरा पोलिस ठाण्यात गेली आणि तक्रार दिली.