पोलिसांकडून ड्रोनबंदी आदेश जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांकडून ड्रोनबंदी आदेश जारी
पोलिसांकडून ड्रोनबंदी आदेश जारी

पोलिसांकडून ड्रोनबंदी आदेश जारी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोनबंदी करण्यात आली आहे. ड्रोनबंदीसंबंधी आदेश मुंबई पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) विशाल ठाकूर यांनी सोमवारी जारी केला आहे. सदर आदेश १९ जानेवारीच्या रात्रीपासून २० जानेवारीच्या रात्रीपर्यंत २४ तासांपर्यंत अमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतील बीकेसी एमएमआरडीए ग्राऊंड येथे कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून आदेश लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान अतिरेकी/ असामाजिक तत्त्व ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा वापर करून घातपात करू शकतात. परिणामी शांतता भंग होण्याची शक्यता आहे. मानवी जीवनाला होणारा संभाव्य धोका पाहता या उपकरणांवर २४ तास बंदी घालण्यात आली आहे.