भात खरेदी केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात खरेदी केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट
भात खरेदी केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट

भात खरेदी केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट

sakal_logo
By

सरळगांव, ता. १९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात सरकारच्या वतीने खरेदी केल्या जाणाऱ्या भातखरेदी केंद्रावर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी भेट दिऊन खरेदी केलेल्या भाताची पाहणी केली. भातविक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना भाताचे वजन करून घेण्यासाठी ताटकळत ठेवू नका, असे आदेशही त्‍यांनी दिले. मुरबाड तालुक्यातील विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी मुरबाड दौरा आयोजित केला होता. या वेळी शासकीय भातविक्री केंद्रावर भेट देऊन भाताच्‍या दर्जाची तपासणी केली. या वेळी शेतकऱ्यांना होणाऱ्या अडीअडचणीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्‍यांनी केल्या.