टीसीच्या सतर्कतेमुळे दोन मुले सुखरुप घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीसीच्या सतर्कतेमुळे दोन मुले सुखरुप घरी
टीसीच्या सतर्कतेमुळे दोन मुले सुखरुप घरी

टीसीच्या सतर्कतेमुळे दोन मुले सुखरुप घरी

sakal_logo
By

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : कल्याण रेल्वे स्थानकात टीसीच्या सतर्कतेने पळून गेलेल्या मुलांना पकडण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोर्ट बॅचचे तिकीट निरीक्षक सुनील सांबरे हे फलाट क्रमांक ४/५ वर तिकीट तपासत असताना त्यांची नजर एका संशयित मुला-मुलीवर पडली. त्या दोघांकडे सांबरे यांनी तिकीट मागितल्यावर ते दोघेही घाबरले. तिकीट निरीक्षक सुनील सांबरे आणि त्यांचे रेल्वे सुरक्षा बल सहकारी हरिओम गुर्जर यांनी संशयावरून त्यांची चौकशी केली. चौकशीते दोघेही घरातून पळून आल्याचे समोर आले.
सांबरे यांनी हा प्रकार रेल्वे संरक्षण दलाला कळवला आणि पुढील कारवाईसाठी कल्याण रेल्वे सुरक्षा बळाकडे सुपूर्द केला. रेल्वे संरक्षण दल कल्याण अधिकाऱ्यांनी तात्काळ मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्याची माहिती रेल्वे संरक्षण दलाला मिळाली. मुलाच्या पालकांनाही ही माहिती देण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांकडे सोपवले आहे. या कौतुकास्पद कामाबद्दल तिकीट निरीक्षक सुनील सांबरे आणि आरपीएफ कर्मचारी हरिओम गुर्जर यांचे कौतुक केले जात आहे.